Friday, December 26, 2008

शिवधर्म विवाह संस्कार -shivdharma marriage

शिवधर्म विवाह संस्कार

शिवधर्मियांमध्ये शिवविवाह हा अत्यंत पवित्र व सामाजिक बंधनाचा शिवसंस्कार आहे.संस्कार म्हणजेच सांस्कृतिक वसा हस्तांतरित करने.विवाह हा स्त्री व पुरुषांना शारीरिक बंधनात प्रतिबद्ध करण्याचा प्रकार नाही ,या माध्यमातून एक निरामय,निरोगी,बुद्धिमान,सर्जनशील जोडपे संस्कारित करण्याचा विधि आहे.

दिनांक २७ जुलै २००८ रोजी शिवधर्म संसद यांनी शिवधर्म पीठ सिंदखेड राजायेथे शिवविवाह संस्कार पद्धतीस मान्यता दिली.उपस्थित संसद सदस्य-

१) शिवमती रेखाताई खेडेकर.

२) शिवमती डॉ विजयाताई कोकाटे.

३) शिवमती मंदाताई निमसे.

४) शिवश्री नेताजीराव गोरे.

५) शिवश्री देवानंद कापसे.

संस्कार विधी

शिवविवाह संस्काराचे पौराहित्य करणार्‍या शिवसेवक,शिवसेविका वा इतर स्त्री पुरुषांना हा उपविधी ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.यातील विधी असे आहेत-

१) शिवविवाह

२) शिवविवाह :कायदेशीर व सामाजिक बाबी.

३) मुलगा वा मुलगी पाहणे समारंभ.

४) जोडीदार निवड.

५) मुलगा-मुलगी पसंती.

६) शिवविवाह निश्चिती समारंभ.

७) शिवविवाह निश्चिती समारंभ- सोयरीक.

८) शिवविवाह निश्चिती समारंभ- कुंकू टीळा

९) शिवविवाह निश्चिती समारंभ-सामूहिक साखरपुडा विधी.

१०) शिवविवाह समारंभ.

११) नोंदणी पद्धतीचा विवाह.

१२) शिवविवाह-पूर्वतयारी.

१३) शिवविवाह-पुर्वविधी.

१४) प्रत्यक्ष शिवविवाह समारंभ.

१५) सामूहिक शिवविवाह समारंभ.

१६) शिवविवाह नोंदणी समारंभ.

हे सर्व संस्कार विधी शिवधर्म साहित्य निर्मिती गण,(शिवधर्म पीठ, मात्रुतीर्थ, सिंदखेडराजा) ह्यांनी जिजाई प्रकाशनच्या शिवधर्मसंस्कारमालेमार्फ़त २४ सप्टे २००८(शिवधर्म पीठ स्थापना दिन) ला प्रकाशित केले आहेत.

"शिवविवाह संस्कार"-पुरुषोत्तम खेडेकर. (प्रकाशन क्रमांक-१०१)

वितरक आणि प्रकाशक-

जिजाई प्रकाशन. ५८४,नारायण पेठ,कन्याशाला बसस्टॉप,पुणे-४११०३०.०२०-२४४७६५३९.

इंटरनेट प्रकाशक- शिवधर्म सेवा मंडळ,